“अबकी बार पाटीदार” : माध्यमांचा कयास; पण मोदी – शहांच्या मनातले नाव घेऊन प्रल्हाद जोशी, नरेंद्रसिंग तोमर गांधीनगरमध्ये दाखल


वृत्तसंस्था

गांधीनगर : गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर गांधीनगर मध्ये दाखल झाले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या “मनातले नाव” घेऊन आल्याचे सांगण्यात येत आहे. Union Minister & BJP’s central observer for Gujarat, Narendra Singh Tomar in Ahmedabad

माध्यमांनी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आणखी काही नावे जोडली असून “अबकी बार पाटीदार” म्हणत उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह पुरुषोत्तम रूपाला, मनसुख मांडविया, प्रफुल्ल पटेल, गोवर्धन झपाडिया यांच्या नावांचे पतंगही उडवले आहेत. प्रत्यक्षात कोणत्याही माध्यमाकडे “कनफर्म न्यूज” नाही.

आत्तापर्यंत माध्यमांनी आत्तापर्यंत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेकांची नावे पुढे – मागे सरकवली. परंतु, खात्रीलायक बातमी कोणालाही देता आली नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे माध्यम केंद्रित राजकारण करत नाहीत. त्यामुळे कुठल्याही “सोर्स” म्हणून मधून त्यांना “कन्फर्म न्यूज” उपलब्ध होत नाही.

कर्नटक, उत्तराखंडाच्या बाबतीत हा अनुभव घेऊन झालेला आहे. गुजरातमध्ये आता तेच सुरू आहे. त्यामुळे माध्यमांनी जरी “अबकी बार पाटीदार” म्हणून पाटीदार नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी पुढे केली असली तरी मोदी यांच्या मनात नेमके कोणते नाव आहे?, त्यावरच गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री ठरणार आहे. हे नाव घेऊन केंद्रीय निरीक्षक प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर गांधीनगर मध्ये दाखल झाले आहेत.

Union Minister & BJP’s central observer for Gujarat, Narendra Singh Tomar in Ahmedabad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात