पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये ; भाजप खासदार पतीची घटस्फोटाची तयारी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद घरापर्यंत


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला राजकीय गोंधळ आता नेत्यांच्या घरांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील बिष्णुपूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी सौमित्र खान यांनी आता पत्नीला घटस्फोट देण्याचे ठरवले आहे. Wife in Trinamool Congress; BJP MP’s husband prepares for divorce
Political controversy in West Bengal to the house

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सौमित्र खान यांनी तृणमूल काँग्रेसवर आपले प्रेम हिसकावून घेतल्याचा आरोप केला. घटस्फोटावर खान म्हणाले, “तृणमूल काँग्रेसने माझे प्रेम हिसकावले आणि सुजाताने त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे घटस्फोट हा सर्वात मोठा आणि सर्वोत्तम निर्णय आहे.”याआधी सुजाता मंडल म्हणाल्या की, माझ्या आवडत्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यामुळे मी तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुवेंदू अधिकारी यांना भाजपने पक्षात स्थान का दिले, असा संताप सुजाता मंडल यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्याचवेळी, अधिकारी यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सौमित्र खान म्हणाले की, सुवेन्दू अधिकारी हे पश्चिम बंगालचे आयकॉन आहेत. नुकताच TMC चा राजीनामा देणारे अधिकारी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात सामील झाले होते.

Wife in Trinamool Congress; BJP MP’s husband prepares for divorce Political controversy in West Bengal to the house

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था