कोरोनाबाधित नवऱ्याला किडणी देण्यासाठी बायकोने मागितली सर्व संपत्ती ; राजस्थानातील कोविड सेंटरमध्ये नातेवाईकांत तुफान मारामारी


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानच्या भरतपूर येथील जिल्हा रुग्णालयात  कोरोनाबाधिताला किडणीचा त्रास होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने तिची किडणी द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. ती किडणी देण्यास तयार झाली. मात्र सर्व संपत्ती तिच्या नावावर करून देण्याची अट घातली. त्यावरून रुग्णालयातच नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे रुग्णावर किडणी नको, पण भांडणे थांबवा म्हणण्याची वेळ आली असावी. एवढा हा भयानक प्रकार घडला आहे. Wife demands All the property to give her kidney to the corona infected husbandभरतपुरातील धानोता गावातील रुपकिशोर यांना कोरोना झाला होता. त्यांना किडणीचा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी त्यांच्या बायकोला किडणी देण्यासाठी सांगितले. मात्र, नवऱ्याची सर्व संपत्ती आपल्या नावावर केली तरच किडणी देऊ, असे तिने स्पष्ट केले. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. नातेवाईक आणि रुपकिशोरच्या पत्नी यांच्यात वादा झाला. पत्नीच्या घरची मंडळी कोविड विभागात घुसून रुपकिशोरच्या नातेवाईकांशी भांडू लागले. भांडण, हाणामारी सुरू झाली. त्यांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारले. तिथले पंखेही एकमेकांवर फेकले.

Wife demands All the property to give her kidney to the corona infected husband

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण