अयोध्येच्या बाबरी मशिदीत रामलल्लाच्या मुर्ती ठेवल्या; मग गेला काँग्रेसचा सत्तासूर्य अस्ताला


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या राजवटीत अयोध्येतील बाबरी मशिदीत रामलल्लाच्या मूर्ती काँग्रेसने का ठेवल्या? याचे गूढ काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांना पुस्तक लिहून उलगडलेले नाही, असेच दिसते. पण, मूर्ती का ठेवल्या? राजकारण की आणखी काही रहस्य त्यामागे होते, हे मात्र काँग्रेसवालेच जाणोत. why Placed idols of Ramallah in the Babri Masjid of Ayodhya; Then the sun of Congress went down

सलमान खुर्शीद यांनी नुकतेचSunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times  या शिर्षकाचे पुस्तक लिहिले आहे. अयोध्येत सूर्योदय, राष्ट्रीयत्व आमच्या काळातले, असे मराठीत शीर्षक आहे. पण, बाबरी मशिदीत अचानक काँग्रेसने रामाच्या मूर्ती का ठेवल्या आणि रामभक्तांसाठी कवाडे का उघडली, याचे रहस्य काय आहे? का एकेकाळी एका रामाला वनवासात पाठवल्याचे पितळ उघडे पडण्याची धास्ती तर काँग्रेसवाल्यांनी घेतली नव्हती ना ? असे काय घडले की, अचानक अयोध्येचा प्रश्न का चव्हाट्यावर आणला गेला.


राम मंदिर भूमिपूजन वर्धापनदिन : मुख्यमंत्री योगी तीन तास राहणार अयोध्येत, संतांची घेणार भेट


अयोध्या आणि फैजाबादचा परिसर एकदम का शहारून गेला. असे काय घडले होते त्या दिवशी. राजीव गांधी यांच्या सरकारला अचानक अशी कोणती गोष्ट बोचली की ताडकाफडकी मूर्ती बाबरी मशिदीत ठेवाव्यात. त्याद्वारे नागरिकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा हा प्रयत्न नव्हता का की कोणते एखादे प्रकरण त्या काळात न्यायालयात जाणार होते की, गेले होते? याचे गूढ रहस्य काय ते काँग्रेसवाले जाणोत. पण, शारयूत मात्र काही तरी वेगळेच पाणी मुरत असावे.

वनवासात पाठविलेल्या रामावर केलेल्या अन्यायाची चाहूल जनतेचा कानी पडून संतापाचा भडका उडेल आणि त्याची काँग्रेसला झळ पोचू नये, यासाठी तर त्याच्या रामाच्या मूर्ती त्यांनी तातडीने मशिदीत ठेवल्या नाहीत ना?, असे एकंदरीत वाटते. धर्मनिरपेक्ष काँग्रेसला अचानक रामाचा पुळका तेव्हा का आला. मूर्ती ठेवण्याचा हा अट्टाहास का होता, याचे रहस्य काँग्रेसवालेच जाणोत.

why Placed idols of Ramallah in the Babri Masjid of Ayodhya; Then the sun of Congress went down

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात