काश्मीर फाईल्स चित्रपट यू ट्यूबवर का टाकला नाही? बिथरलेल्या केजरीवाल यांचा पंतप्रधानांवर निशाणा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बिथरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची नाही हा संकेत त्यांनी मोडला आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून टीका करताना ते म्हणाले की हा चित्रपट यू ट्यूबवर का टाकला नाही.Why Kashmir Files movie has not been uploaded on YouTube? Kejriwal targets PM

केजरीवाल म्हणाले, कोण्या एका विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटासाठी पंतप्रधानांना शरण जावे लागणे, ही वेदनादायक बाब आहे. याचा अर्थ गेल्या आठ वर्षात देशात कोणतेही विकासाचे काम झाले नाही. करमुक्तीची मागणी करण्यापेक्षा हा चित्रपट यू ट्यूबवर सर्वांना मोफत पाहायला का टाकला नाही?


 


काश्मीर फाईल्स दिल्लीत टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर उत्तर देताना केजरीवाल विधानसभेत बोलत होते. सध्या देशात काश्मीर फाईल्स हा चित्रपट गाजत आहे. हा मुद्दा उपस्थित करून केजरीवाल म्हणाले, या चित्रपटापुढे पंतप्रधानांना शरण जावे लागले, याचा अर्थ गेल्या आठ वर्षांत देशात कोणतेही विकासाचे काम झाले नाही.

हा चित्रपट जर करमुक्त केला तर हा चित्रपट यू ट्यूबवर सर्वांना मोफत पाहायला का टाकला नाही, असा सवाल त्यांनी केला. भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांचे छायाचित्रे लावत असल्याचे वैषम्य आहे. डॉ. आंबेडकरांनी निवडणूक प्रक्रियेची व्यवस्था केली, त्यामुळे भाजपचे नेते बाबासाहेबांचा तिरस्कार करतात, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.

Why Kashmir Files movie has not been uploaded on YouTube? Kejriwal targets PM

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात