Basmati Rice War : बासमती तांदळाची मालकी कोणाची ? भारत-पाकिस्तान आमने-सामने उभे


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगात सुवासिक तांदूळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बासमतीवरून भारत आणि पाकिस्तान आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
Who owns the basmati rice? ; India-Pakistan face to face in Uropiyan market
भारत आणि पाकिस्तान बासमती तांदळाची युरोपात मोठी निर्यात करतात. भारताने युरोपियन युनियनच्या मार्केटमध्ये बासमती राईसला प्रोटेक्टेड जिऑग्राफिकल इन्डिकेशनचा (PGI) दर्जा मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे तांदळाची बाजारपेठ गमावली जाण्याची धास्ती वाटल्याने पाकिस्तानने विरोध केला. भारताच्या या अर्जाला पाकिस्तानने जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे बासमतीवरुन भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रूदेश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.



भारताला प्रोटेक्टेड जिऑग्राफिकल इन्डिकेशनचा दर्जा जर मिळाला तर संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये केवळ भारताच्याच बासमतीची विक्री होईल. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे. तसेच अनेक रोजगार संकटात येणार आहे. अगोदरच बासमती कोणाचा यावरून वाद आहेत. दोन्ही देश तांदळाच्या ट्रेडमार्कवर दावा करत आहेत. भारताने 2010 मध्ये आठ राज्यांतील बासमतीला जीआय टॅग दिला होता. पाकिस्ताननेही 18 जिल्ह्यांतील बासमतीला जीआय टॅग दिला होता.

Who owns the basmati rice? ; India-Pakistan face to face in Uropiyan market

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात