जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूंना बहाल केली नवी नावे


विशेष प्रतिनिधी

जीनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या विषाणूच्या विविध प्रकारांना ग्रीक बाराखडीचा वापर करून निश्चिरत नावे दिली आहेत. त्यानुसार, भारतात सर्वप्रथम आढळलेल्या ‘बी.१.६१७.१’ या विषाणू प्रकाराला ‘कप्पा’ आणि ‘बी.१.६१७.२’ या प्रकाराला ‘डेल्टा’ असे नाव देण्यात आले आहे. WHO gives names for corona strains

विविध देशांमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणू प्रकारांचे शास्त्रीय नाव न बदलता, केवळ रोजच्या वापरासाठी त्यांना नवीन नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार भारतातील विषाणूंना ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ असे नाव मिळाले आहे. विषाणू प्रकारांना दिलेली नावे उच्चारण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपी आहेत. तसेच, देशांच्या नावावरून विषाणूंना ओळखले जाण्याचा अवमानास्पद वाटणारा प्रकारही टाळला जाणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.



‘अवमानास्पद आणि संभ्रम निर्माण करणारी नावे बदलण्यासाठी केवळ चर्चेत वापरासाठी नवी नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सर्व देशांनी या नव्या नावांचा वापर करावा. अमेरिकेत आढळलेल्या कोरोना विषाणू प्रकारांना ‘एप्सिलॉन’ आणि ‘आयोटा’ अशी नावे देण्यात आली आहेत.

WHO gives names for corona strains

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात