विशेष प्रतिनिधी
चंदीगड : खून आणि बलात्काराचा आरोप असलेला पंजाबमधील डेरा सच्चा सौदाचा बाबा राम रहीम 7 ते 27 फेब्रुवारी दरम्यान 21 दिवसांच्या विशेष पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर ही कृपा करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.Who brought Baba Ram Rahim out of jail on parole? Discussions continue about who will have the political advantage
पंजाबमधील मालेरकोटला जिल्ह्यातील बाबा राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाचा मुख्य तळ येथे आहे. 20 फेब्रुवारीला पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. डेरा सच्चा सौदाचे पंजाबमध्ये सुमारे 40 लाख समर्थक आहेत. यातील बहुतांश समर्थक इतर मागासवर्गीय ,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत.
पंजाबमधील सुमारे 40 विधानसभा जागांवर या डेराचा प्रभाव असल्याचा दावाही केला जात आहे. डेराची स्वत:ची राजकीय समितीही आहे. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि अकाली दल या दोन्ही पक्षांना हुशारीने पाठिंबा दिला होता.बाबा राम रहीम बाहेर डेराचे सेवक आनंदी आहेत. डेराची राजकीय समिती निर्णय घेईल. समिती ज्याला सांगेल त्याला मतदान कले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App