विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानातून परागंदा झालेले अध्यक्ष अश्रफ घनी यांना आता कोणता देश आश्रय देणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने ते अध्यक्ष झाले होते. त्यामुळे ते अमेरिकेत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.Which country will give stay to Ghani
घनी यांनी देश सोडताच काल त्यांना ताजिकिस्तानने पहिला झटका दिला होता. अफगाणिस्तानातून ताजिकिस्तान येथे आलेल्या घनी यांच्या विमानाला उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ओमानला थांबावे लागले होते. आता ते ओमानहून अमेरिकेला रवाना होवू शकतात.
अश्रफ घनी यांच्याशिवाय अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहिब देखील ओमानमध्ये आहेत. दोघांच्या विमानाला ताजिकस्तानमध्ये उतरता आले नाही आणि त्यांना ओमानकडे वळावे लागले. ७२ वर्षीय अश्रफ घनी हे अफगाणिस्तानचे चौदावे अध्यक्ष आहेत. त्या आधी ते देशाचे अर्थमंत्री आणि काबूल विद्यापीठाचे कुलगुरू देखील राहिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App