काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यात पोहोचून कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्यांची भेट घेतली. त्यांनी गोव्यातील वेल्साओ येथील मासेमारी समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. गोव्याला आम्ही प्रदूषित ठिकाण बनू देणार नाही, असे ते म्हणाले. आम्ही ते कोल हब होऊ देणार नाही. आम्ही सर्वांसाठी पर्यावरणाचे रक्षण करत आहोत. Whatever is said in our manifesto is a guarantee not a promise congress leader rahul gandhi said in goa
वृत्तसंस्था
पणजी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यात पोहोचून कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्यांची भेट घेतली. त्यांनी गोव्यातील वेल्साओ येथील मासेमारी समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. गोव्याला आम्ही प्रदूषित ठिकाण बनू देणार नाही, असे ते म्हणाले. आम्ही ते कोल हब होऊ देणार नाही. आम्ही सर्वांसाठी पर्यावरणाचे रक्षण करत आहोत. गोव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, आम्ही छत्तीसगडमध्ये निवडणूक लढवली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आणि ते आम्ही पूर्ण केले. तुम्ही पंजाब, कर्नाटकात जाऊनही याची पुष्टी करू शकता. आमच्या जाहीरनाम्यात जे काही आहे ते गॅरंटी आहे, आश्वासन नाही.”
Congress leader Rahul Gandhi interacts with members of the fishermen community in Velsao, Goa. We will not allow Goa to become a polluted place. We will not allow it to become a Coal hub. We are protecting the environment for everyone: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/8EyU1b54Sj — ANI (@ANI) October 30, 2021
Congress leader Rahul Gandhi interacts with members of the fishermen community in Velsao, Goa.
We will not allow Goa to become a polluted place. We will not allow it to become a Coal hub. We are protecting the environment for everyone: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/8EyU1b54Sj
— ANI (@ANI) October 30, 2021
2022 मध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरसह गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत शक्यतो निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली. राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तीन दिवसांचा गोवा दौरा केला आहे.
गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या राजकीय वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कांदोळकर यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे वर्णन ‘देवी दुर्गा’ आणि राज्यातील भाजप सरकारचे ‘भस्मासुर’ असे केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत संतापले आहेत. गोव्याला पश्चिम बंगालमधून दुर्गा इथे आणायची आहे आणि हा भस्मासुर भाजप सरकारचा पराभव करतो, असे GFP नेते कांदोळकर यांनी शनिवारी सांगितले. त्यांनी कबूल केले की त्यांचा पक्ष ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीशी युतीसाठी बोलणी करत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका टीएमसीसोबत युती करून लढवण्याची त्यांची इच्छा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App