राहुल गांधींना लोकसभेतले काँग्रेसचे नेतेपद देण्याच्या हालचालींना वेग; 14 जुलैला सोनियाजींची संसदीय समितीबरोबर महत्त्वाची बैठक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांच्या चर्चांनी जोर धरला आहे. अतिवरिष्ठ पातळीपासून सर्वांत खालच्या स्तरापर्यंत काँग्रेस संघटनेत बदल करण्याचा मनसूबा १० जनपथने निश्चित केला आहे. Congress Parliament strategy group meet to be held on July 14. Sonia Gandhi to chair the meet that’ll be held virtually

या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाचे धोरण ठरविणाऱ्या समितीची Congress Parliament strategy group बैठक येत्या १४ जुलैला म्हणजे परवा होणार आहे. संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनातच राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेतले काँग्रेसच्या गटाचे नेतेपद सोपविण्याच्या विषयावर या वेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

सध्या अधीर रंजन चौधरी यांच्याकडे लोकसभेले काँग्रेसचे नेतेपद आहे. ते पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत. मात्र, त्यांच्याकडून लोकसभेतले नेतेपद काढून घेऊन ते राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्याच्या हालचाली बंगाल निवडणूकीनंतर तेज झाल्या आहेत.



अधीर रंजन यांचा लोकसभेत प्रभाव पडत नसल्याचे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे. प्रत्यक्षात राहुल गांधी यांचे संसदीय नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्याचे सोनिया गांधी यांनी ठरविल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. २०२४ मध्ये राहुल गांधी यांना अधिकृतपणे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करायचे असेल, तर त्यांचा संसदीय नेतृत्वाचा प्रभाव दाखविणे उपयोगी ठरू शकेल, असा सोनियाजींचा होरा आहे. त्यांच्या बरोबर प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशात active करून तेथेही काँग्रेसचा गमावलेला मतदार काही प्रमाणात पक्षाकडे खेचून आणण्याचा सोनियाजी प्रयत्न करीत आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

१४ जुलैच्या बैठकीत या दोन्ही विषयांवर व्यापक चर्चा होऊन नंतर निर्णय जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होणार आहेत, हे निश्चित आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Congress Parliament strategy group meet to be held on July 14. Sonia Gandhi to chair the meet that’ll be held virtually

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात