तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून होणार आणि त्यांना पोलीसांकडून मिळणारे अभय यामुळे पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व ६१ आमदारांना केंद्राने एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.West Bengal Police is no longer trusted, the Center will provide security to all BJP MLAs
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून होणार आणि त्यांना पोलीसांकडून मिळणारे अभय यामुळे पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व ६१ आमदारांना केंद्राने एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये २ मे रोजी निवडणुकांचा निकाल लागल्यापासूनच हिंसाचार सुरू झाला आहे. तृणमूल कॉँग्रेसचे गुंड भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत. अनेक गावांमध्ये भाजपला मतदान केल्याच्या आरोपावरून घरे जाळली गेली.
भाजपाच्या कार्यालयांवरील हल्ले सुरू आहेत. ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे भारतीय जनपक्षाचे सुवेंदू अधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.
ऐवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावरही पश्चिम मिदनापूर येथे हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या ताफ्यातील वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले. लाठ्या काठ्या घेऊन वाहनांवर हल्ला करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर केंद्राने औद्योगिक सुरक्षा दलाच्या मार्फत पश्चिम बंगालमधील सर्व ६१ आमदारांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे.एक्स दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत तीन ते पाच हत्यारी जवान चोवीस तास सोबत असणार आहे.
एखाद्या आमदाराला असणारा धोका लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे.पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत केंद्राने पोलीसांकडून अहवाल मागविला होता. त्याचबरोबर केंद्रीय गुप्तचर संस्थांकडूनही सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समितीही येथील परिस्थितीचा आढावा घेत आहे. आमदारांना धोका असल्याचे सर्वच संस्थांनी सांगितल्यानंतर केंद्रीय गृह विभागाने सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App