विशेष प्रतिनिधी
कोलकता – प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा जाहीरपणे चिंता व्यक्त केली आहे. हिंसाचार संपावा म्हणून राज्य सरकारच काम करताना दिसत नाही. पश्चि म बंगालमध्ये राज्यघटना संपली आहे अशा शब्दांत ते बरसले.
मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर ते म्हणाले, रात्री हिंसाचाराच्या बातम्या मिळतात सकाळी मात्र सगळे काही ठीक असल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारने जनतेचा विश्वाळस पुन्हा मिळवावा. कायद्याची चौकट मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी.
हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी मला हेलिकॉप्टर दिले गेले नाही. हे योग्य नव्हे. हा हिंसाचार असाच सुरु राहिल्यास घटनात्मक मार्गाने पश्चिाम बंगाल सांभाळणे अवघड बनत जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App