पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी विजयाची नोंद करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नव्या पवित्र्यामुळे ममतांना आमदार म्हणून शपथ घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 7 ऑक्टोबर रोजी आमदार म्हणून शपथ देण्यासाठी राज्यपाल जगदीप धनखड यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांनी सध्या प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी सांगितले की ते, अधिकृत राजपत्र होईपर्यंत प्रतीक्षा करतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम होईल. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ममतांनी 4 नोव्हेंबरपर्यंत शपथ घेणे गरजेचे आहे. West Bengal CM Mamata Won by polls But have to wait for Oath As Of now ball Is in Governor Jagdeep Dhankhar Court
प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी विजयाची नोंद करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नव्या पवित्र्यामुळे ममतांना आमदार म्हणून शपथ घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 7 ऑक्टोबर रोजी आमदार म्हणून शपथ देण्यासाठी राज्यपाल जगदीप धनखड यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांनी सध्या प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी सांगितले की ते, अधिकृत राजपत्र होईपर्यंत प्रतीक्षा करतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम होईल. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ममतांनी 4 नोव्हेंबरपर्यंत शपथ घेणे गरजेचे आहे.
राज्यपाल जगदीप धनखड यांच्या या भूमिकेनंतर राजभवन आणि तृणमूल काँग्रेस सरकार यांच्यातील वाद पुन्हा भडकणार आहे. विधानसभेत पत्रकारांशी बोलताना ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी म्हणाले, “आम्ही 7 ऑक्टोबर रोजी दुपारपूर्वी ममता बॅनर्जींना शपथ देण्याची विनंती माननीय राज्यपालांना केली आहे. त्यांनी राज्य विधानसभेत शपथ घेण्यासाठी यावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला आशा आहे की राजपत्र अधिसूचना 7 ऑक्टोबरपर्यंत जारी केली जाईल आणि ते विधानसभेत येऊन आमच्या विनंतीचा सन्मान करतील. ममता बॅनर्जींसह तिन्ही आमदारांना शपथ देतील.” राज्यपालांनी ट्विट करून माहिती दिली
Raj Bhawan response on the administration of Oath/Affirmation to the Members elected to the WBLA in bye-election from 159-Bhabanipur A/C, and the adjourned poll in 56-Samserganj and 58-Jangipur A/Cs held on 30 September, 2021. Once Gazetted Governor would take call. pic.twitter.com/db2tS4pdbY — Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) October 4, 2021
Raj Bhawan response on the administration of Oath/Affirmation to the Members elected to the WBLA in bye-election from 159-Bhabanipur A/C, and the adjourned poll in 56-Samserganj and 58-Jangipur A/Cs held on 30 September, 2021. Once Gazetted Governor would take call. pic.twitter.com/db2tS4pdbY
— Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) October 4, 2021
राज्यपालांनी स्पीकरकडून शपथ घेण्याचा अधिकार काढून घेतला
दुसरीकडे, हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, राज्यपालांनी सभापतींकडून शपथ घेण्याची शक्ती हिरावून घेतली आहे. भवानीपूर आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातील दोन जागांच्या पोटनिवडणुकीच्या काही दिवस आधी सभापती कार्यालयाला राजभवनातून पत्र मिळाले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. राज्यपालांना शपथ देण्याचे अधिकार देणाऱ्या या पत्रात संविधानाच्या अनुच्छेद 188 चा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विनंतीला उत्तर देताना राज्यपाल म्हणाले की, एकदा पोटनिवडणुकीच्या निकालांची अधिसूचना प्रकाशित झाल्यावर त्यानंतर ते यावर निर्णय घेतील.
4 नोव्हेंबरपर्यंत शपथ घेणे आवश्यक आहे
ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 58,835 मतांच्या प्रचंड फरकाने विजयी झाल्या आहेत. या जागेवरून त्यांनी 2011 चा स्वतःचा विक्रम मोडला आहे. टीएमसीने रविवारी जंगीपूर आणि समसेरगंजच्या इतर दोन विधानसभा जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून राहण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी 4 नोव्हेंबरपर्यंत विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेणे आवश्यक आहे. टीएमसी नेत्यांचे म्हणणे आहे की, ममतांना दुर्गा पूजेपूर्वी सर्व औपचारिकता पूर्ण करायची आहे, ज्यात आता खूपच कमी वेळ शिल्लक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more