दिवाळीला “जश्न ए रिवाज” करायला गेले; फॅब इंडिया ट्रोल झाले!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिवाळीसारख्या प्रकाशाच्या उत्सवाला फॅब इंडियाने “जश्न ए रिवाज” म्हणत त्याला मुस्लिम टच देण्याचा प्रयत्न केला आणि फॅब इंडियाचा ब्रँड ट्रोल झाला. सोशल मीडियातून ठोक ठोक ठोकणे खाल्ल्यानंतर फॅब इंङियाने अखेर “जश्न ए रिवाज” हे आपले कॅम्पेन मागे घेतले.Went to “Jashn-e-Rivaj” on Diwali; Fab India became a troll

पण त्यापूर्वी फॅब इंङियाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपली जाहिरात करताना दिवाळसणाला “जश्न ए रिवाज” असे म्हणत त्याला मुस्लिम टच देण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांना हे कॅम्पेन खटकले. सोशल मीडियावर बोयकॉट फॅब इंडिया हा हॅशटॅग ट्रेंङ करण्यात आला.



भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या, मोहनदास पै आदींनी दिवाळी हा हिंदूंचा धार्मिक सण आहे. ईद आणि ख्रिसमस हे दुसऱ्या धर्मीयांचे सण आहेत. दिवाळी हा काही जश्न ए रिवाज नाही. फॅब इंडिया कारण नसताना नवा वाद उकरून काढत आहे. यातून ते स्वतःचे आर्थिक नुकसान करत आहेत, असा इशारा तेजस्वी सुर्या यांनी दिला होता. दिवसभर सोशल मीडियात चोहो बाजूंनी ट्रोल झाल्यानंतर फॅब इंडियाने आपले जश्न ए रिवाज हे कॅम्पेन मागे घेतले.

Went to “Jashn-e-Rivaj” on Diwali; Fab India became a troll

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात