दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता द्या; एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी


प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वेळोवेळी वाढ केली असून त्यांना या महिन्यापासून २८ टक्के महागाई भत्ता लागू झाला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही १२ % च महागाई भत्ता मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकीत महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.Give exhausted dearness allowance to ST employees before Diwali

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर होत नाही. वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी कर्जबाजारी झाले. त्यामुळे जवळपास २५ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

वेतन ७ नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबर रोजी करावे

दिवाळी सण तोंडावर आला असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर २०१९ पासून आजअखेर प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याचा फरक कर्मचारी व अधिकारी यांना अदा करावा, तसेच या महिन्यापासून सदर महागाई भत्ता हा शासनाप्रमाणे २८ टक्के इतका देण्यात व दिवाळी सण ४ नोहेंबरपासून सुरू होत असल्याने ऑक्टोबर महिन्याचे वेतन ७ नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबर रोजी करावे, अशी मागणीही त्यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने ही मागणी पूर्ण केली तर कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

Give exhausted dearness allowance to ST employees before Diwali

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात