नगरसेवक फोडण्याचा बार फुसका, हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकून बघतोय कोण?; भाजपचा पलटवार

प्रतिनिधी

मुंबई – भाजपचे १५ – २० नगरसेवक फोडण्याच्या शिवसेनेच्या दाव्यावर भाजपने पलटवार केला आहे. शिवसेनेला उमेदवारच मिळत नाहीत म्हणून शिवसेनेचे नेते भाजप फोडण्याच्या वल्गना करत आहेत, असा पलटवार भाजपने केला आहे.shiv sena leaders are day dreaming of spliting bjp corporaters

आतापर्यंत शिवसेनेला अनेक मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्यामुळेच त्यांनी बाहेरच्या नेत्यांना बोलवून उमेदवाऱ्या दिल्या. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित, शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव लोखंडे, मध्य दक्षिण मुंबईसाठी विद्याधर गोखले, सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ताडदेव महापालिका प्रभागासाठी अनिल सिंग, अंधेरीतील नगरसेविका संध्या सुनील यादव असे ३५ ते ४० उमेदवार दिले आहेत. ते काय भाजप फोडणार, असे आव्हानच भाजपच्या नेत्यांनी दिले आहे.शिवसेनेकडे योग्य उमेदवारांची वानवा आहे, म्हणूनच ते फोडाफोडीची भाषा करीत आहेत. भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. गेले २५ वर्षे युतीत असताना शिवसेनेला जेव्हा उमेदवार सापडत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत

याची आठवण करून देत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा टोला भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेनेला लगावला आहे.

shiv sena leaders are day dreaming of spliting bjp corporaters

महत्त्वाच्या बातम्या