शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडायचा मुहूर्त काल जाहीर केला आणि आज आकडा!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईतले भाजपचे नगरसेवक फोडण्याचा मुहूर्त काल जाहीर केला आणि आज आकडाही जाहीर करून ते मोकळे झाले.Shiv Sena announced the moment to fire BJP corporator yesterday

एकीकडे सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठक सुरू असताना मुंबई महापालिकेत शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपचे १५-२० नगरसेवक फोडण्याचा आकडा आज जाहीर केला.

त्यामुळे मुंबई महापलिकेच्या निवडणुकीचे फटाके दिवाळी पूर्वीच फोडण्यास सुरुवात झाली असून, शिवसेनेने भाजपाचे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा
दावा केला आहे. तब्बल १५-२० नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. हे नगरसेवक भाजपाच्या नेतृत्वाला कंटाळले असल्याने ते येत्या डिसेंबरपर्यंत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मन:स्थितीत आहेत, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

भाजपाचे जे काही नगरसेवक नेतृत्वाला कंटाळले आहेत आणि ज्यांना आपल्यावर अन्याय होतो असे वाटत आहे ते सर्व आमच्या शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत, त्यांना शिवसेनेचा आधार वाटत आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. त्यांना आमचा पक्ष नक्कीच आधार देईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

येत्या डिसेंबर महिन्यात १५ ते २० भाजपा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करताना दिसतील. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जे येतील त्यांना आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सन्मानाने पक्षात घेऊन त्यांना मानसन्मान देतील, असे जाधव यांनी सांगितले.

किती नगरसेवक शिवसेनेच्या जाळ्यात?

यापूर्वी शिवसेनेने मनसेचे ६ नगसेवक फोडून त्यांना आपल्या पक्षात घेतले होते आणि मनसे पक्ष महापलिकेत साफ करुन टाकला होता. आता शिवसेनेने भाजपाला टार्गेट केले असून, एका बाजूला भाजपाच इतर नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपाचे १५ ते २० नगरसेवक गळाला लाऊन ठेवले असून, डिसेंबरला हा गळ बाहेर काढला जाईल आणि नक्की किती नगरसेवक या जाळ्यात अडकले हे स्पष्ट होईल.

Shiv Sena announced the moment to fire BJP corporator yesterday

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात