केरळी मु्स्लिम आणि ख्रिश्चनांचे कल्याण आता पी. विजयन यांच्या हाती 


पाच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द पूर्ण केल्यानंतर सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे पिनाराई विजयन हे केरळच्या इतिहासातले पहिलेच मुख्यमंत्री आहेत. दुसऱ्या टर्मची सुरुवात करताना विजयन यांनी धक्के द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या सरकारमध्ये चांगली कामगिरी केलेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांना यावेळी वगळल्यानंतर केरळचा अल्पसंख्याक कल्याण विभाग स्वतःकडेच ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय विजयन यांनी घेतला आहे. Welfare of  Kerali Muslim and Christian’s is in the hands of P. Vijayan now; Kerala Chief Minister Pinarayi Vijayan  is the first Chief Minister to hold Minorities Welfare Department.


वृत्तसंस्था

तिरुवअनंतरपुरम : केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अल्पसंख्यांक कल्याण विभागही स्वतःकडे ठेवला आहे. केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन या अल्पसंख्यांक धर्मियांचे प्राबल्य आहे. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे मंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतले आहे हे विशेष.

सन 2008 मध्ये एलडीएफची स्थापना झाल्यापासून अल्पसंख्यांक विभागाचे मंत्रीपद त्याच धर्मातल्या आमदारांकडे देण्याचा प्रघात पडला होता. विजयन यांच्या यापूर्वीच्या मंत्रीमंडळात हे खाते माकपच्याच पाठींब्यावर निवडून आलेले आमदार के. टी. जलील यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र जलील यांच्या कार्यशैलीमुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विजयन यांचा अल्पसंख्यांक खाते स्वतःकडे घेण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.



एलडीएफच्या शासनकाळात मलप्पुरम येथून निवडून आलेल्या जलील यांना अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री करण्यात आले. मात्र त्यांनी या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींचे वाटप करताना भेदभाव केल्याचा आरोप झाला. खात्याअंतर्गत नेमणुकांमध्ये जलील यांनी स्वतःच्या नातेवाईकांना स्थान दिले. केरळ अल्पसंख्यांक वित्त विका महामंडळातही जवळच्या नातलगाची नियुक्ती केल्यामुळे लोकायुक्तांकडून जलील यांच्या सत्तेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर गेल्याच महिन्यात त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यातील संघर्षाचा फायदा सीपीआय (एम)ला मिळाला. केरळी ख्रिश्चन पारंपरिकरित्या कॉंग्रेसचे पाठीराखे मतदार राहिले आहेत. मात्र कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायडेट डेमॉक्रॅटीक फ्रंटने युनियन मुस्लिम लीगला सामावून घेतले. एवढेच नव्हे तर मुस्लिम लीगचा प्रभावही वाढू लागला. त्याविरोधातली नाराजी म्हणून ख्रिश्चनांमध्ये फुट पडली आणि एक गट एलडीएफला मिळाला.

निवडणूकीच्या निकालाचे विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, ख्रिश्चनांमधील प्रसिद्ध कॅथोलिक समुदायाला अशी भीती वाटू लागली की कॉंग्रेस प्रणीत यूडीएफ सत्तेवर आल्यास अल्पसंख्यांक विभागाची ताबेदारी मुस्लिम लीगकडेच सोपवली जाईल. यापुर्वीच्या युडीएफच्या सत्ताकाळात अल्पसंख्यांक विभागावर मुस्लीम लीगचीच मक्तेदारी राहिली आहे. त्या काळात केरळी मुस्लिमांनी ख्रिश्चनांवर खूप अन्याय केला अशी भावना कॅथोलिक समाजात दृढ आहे. विशेषतः ख्रिश्चन समाज ही कॉंग्रेसची मतपेढी असल्याचे माहित असूनही युडीएफच्या काळातील मुस्लीम लीगचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मंजुमल अली यांनी ख्रिश्चनांविरोधातली धोरणे राबवली. या कटू अनुभवामुळे मुस्लिम लीगसोबत गेलेल्या कॉंग्रेसला बहुसंख्य ख्रिश्चनांनी नाकारले. त्याचा फटका कॉंग्रेसप्रणीत युडीएफला यावेळी बसला.

या पार्श्वभूमीवर 2021 ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अल्पसंख्यांक कल्याण विभाग मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच घ्यावा असा दबाव ख्रिश्चनांकडून विजयन यांच्यावर येत होता. कोणत्याही स्थितीत हे मंत्रीपद मुस्लिमांकडे देऊ नये, असा आग्रह केरळी ख्रिश्चनांनी धरला होता. त्यामुळे या मंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या माकपचे व्ही. अब्दुर रहेमान यांच्या पदरी निराशा पडली. विजयन यांनी केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच अल्पसंख्यांक कल्याण विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत ठेवला. केरळमधील नाराज ख्रिश्चन समाजाला 2021 च्या निवडणुकीत स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला होता. त्यासाठी भाजपाच्या अनेक वरीष्ठ नेत्यांनी केरळमधल्या कॅथोलिक बिशपांची भेटही घेतली होती. मात्र त्यास फारसे यश आले नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यातील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विजयन यांना आता या दोन्ही धर्मियांना न दुखावण्याची कसरत करावी लागेल.

Welfare of  Kerali Muslim and Christian’s is in the hands of P. Vijayan now; Kerala Chief Minister Pinarayi Vijayan  is the first Chief Minister to hold Minorities Welfare Department.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात