सशस्त्र दलांच्या विमानांसाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड केवळ १५ दिवसांमध्ये तयार करू, नितीन गडकरी यांचे आश्वासन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सशस्त्र दलाच्या विमानांसाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड दीड वर्षांऐवजी केवळ १५ दिवसांमध्ये तयार केल्या जातील,असे वचन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.भारतीय हवाई दलाने गुरुवारी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ)चे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.We will build emergency landing ground for Armed Forces aircraft in just 15 days, assures Nitin Gadkari

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, जेव्हा माननीय वायुसेना प्रमुख माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितले की ही बाडमेरमधील ही लँडिंग फील्ड बांधण्यास दीड वर्षे लागली. मग मी त्यांना सांगितले की, आम्ही तुमच्यासाठी दीड वर्षांच्या ऐवजी १५ दिवसांच्या आत चांगल्या दर्जाच्या लँडिंग फील्ड तयार करू.



सशस्त्र दलांनी येथे एक लहान विमानतळ तयार केले पाहिजे. माझ्या माहितीनुसार येथे जवळपास ३५० किमी परिसरात कोणतेही विमानतळ नाही. मी चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना इथे एक लहान विमानतळ तयार करण्यास सांगितले आहे.

त्यासाठी जर तुम्हाला जमीन हवी असेल तर आम्ही ती तुम्हाला देऊ. तुम्ही तिथे आपल्या विभागाअंतर्गत उपक्रम देखील राबवू शकता. तसेच जर खासगी विमान कंपन्यांनी एक किंवा दोन दैनंदिन उड्डाणे सुरू केली तर स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होईल.

We will build emergency landing ground for Armed Forces aircraft in just 15 days, assures Nitin Gadkari

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!