सिंधू पूजनाने राष्ट्रपतींचे यंदाचे दसरा सीमोल्लंघन लडाखमध्ये जवानांबरोबर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत – चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे यंदाचे दसरा सीमोल्लंघन लडाखमध्ये भारतीय जवानांबरोबर साजरे होणार आहे. राष्ट्रपती आपल्या लडाख दौऱ्यात सिंधू नदी पूजन देखील करणार असून ते विविध बॉर्डर पोस्टवर जाऊन जवानांशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रपतींचे तीन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर लेहमध्ये आगमन झाले, तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. “We welcome President Ram Nath Kovind to the Union Territory of Ladakh,” tweets the office of Lt Governor, Ladakh

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांसमवेत विविध ठिकाणतच्या बॉर्डर पोस्टवर जाऊन दिवाळी साजरी करीत असतात. आतापर्यंत त्यांनी पंजाब, आसाम, जम्मू – काश्मीर, गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या बॉर्डर पोस्टवर जाऊन दिवाळी साजरी केली आहे.



लडाखमध्ये निर्माण झालेल्या भारत – चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे यंदाचा दसरा लडाखमध्ये जाऊन जवानांबरोबर साजरा करणार आहेत. जवानांशी ते संवाद साधणार आहेत.

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या अरूणाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता. भारताने त्या आक्षेपाला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा लडाख दौरा होतो आहे. याला राजनैतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.

“We welcome President Ram Nath Kovind to the Union Territory of Ladakh,” tweets the office of Lt Governor, Ladakh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात