SCO शिखर संमेलन : चीन – रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मोदींचे भाषण, भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब” बनवतोय!’


वृत्तसंस्था

समरकंद : उजबेकिस्तानची राजधानी समरकंद येथील SCO अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार्य संघटना परिषदेचा नेमका “टेक अवे” काय??, असे विचारल्यास सांगावे लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण!! पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि चीन यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या समोर सांगितले, की आम्ही भारताला “मॅन्युफॅक्चरिंग हब” बनवतो आहोत मोदींच्या या भाषणाचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. We want to transform India into manufacturing hub: PM Modi at SCO Summit

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग हे शिखर संमेलनात उपस्थित होते. त्यांच्यासह अन्य सदस्य राष्ट्रांच्या आणि पाहुण्या राष्ट्रांच्या अध्यक्ष, पंतप्रधान आणि प्रतिनिधी समोर समोर बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण कसे सुरू आहे?, यावर विस्ताराने भाष्य केले आहे. यातच त्यांनी भारताला जगाचा “मॅन्युफॅक्चरिंग हब” बनविण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. किंबहुना भारत त्या दृष्टीने पावले टाकतो आहे बहुसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारताकडे वळल्या आहेत आणि भारतात उत्पादन प्लांट सुरू करत आहेत, याकडे मोदींनी लक्ष वेधले आहे.

पंतप्रधान मोदींनी “मॅन्युफॅक्चरिंग हब” हा शब्द उच्चारतानाच एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे कोरोनापूर्वकाळात चीन हा जगाचा “मॅन्युफॅक्चरिंग हब” होता. परंतु कोरोना नंतरच्या काळात भारत “मॅन्युफॅक्चरिंग हब” मध्ये रूपांतरित होताना दिसतो आहे. कोरोना काळातच चीन मधल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपापली उत्पादन केंद्रे बंद करून अथवा त्यांचा साईज कमी करून भारताकडे वळविण्याचे धोरण अवलंबले आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणात याच मुद्द्याचे त्याचबरोबर रशिया – युक्रेन संघर्षाचे देखील प्रतिबिंब पडले आहे. कोरोनामुळे आणि रशिया – युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवरची आणि SCO सदस्य राष्ट्रांमधली उत्पादन आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ती सांधण्याचा भारत प्रयत्न करत आहे आणि भारताला त्यामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून यश देखील येत आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले आहे.

पंतप्रधान मोदींनी आत्तापर्यंत भारतात स्टार्टअप उद्योग आणि मेक इन इंडियाच्या निमित्ताने भारत निर्मित वस्तूंच्या विषयावर अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु आता चीन आणि रशिया यांच्यासारख्या बलाढ्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांसमोर त्यांच्या देशातल्या समस्यांचा ठळक उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी भारताला “मॅन्युफॅक्चरिंग हब” बनवतो आहे, असा इरादा व्यक्त करणे याला जागतिक राजकारण आणि अर्थकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. SCO सारख्या जागतिक व्यासपीठावर हे प्रथमच घडले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 7.5 %

भारतीय अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वाढत्या वेगाने पुढे चालली आहे. इतर देशांमध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर थोडा लडखडला असताना भारत मात्र 7.5% दराने आर्थिक वाढीची अशा धरू शकतो, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त करून
भारतीय अर्थव्यवस्थेचे बलस्थान अधोरेखित केले आहे. भारतात नवी स्टार्टअप अर्थव्यवस्था उभी राहताना भारत कोणत्या प्रकारच्या अभिनव संकल्पना राबवत आहे, त्याचे सविस्तर वर्णन मोदींनी आपल्या भाषणात केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

भारताला आम्ही जागतिक पातळीवरची उत्पादन केंद्री अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारताची अर्थव्यवस्था 7.5% दराने वाढण्याची आम्हाला आशा आहे, जी सध्याच्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत कितीतरी वेगवान आहे. भारताचे विकासाचे मॉडेल लोककेंद्रीत आहे. जन सहभाग हा अर्थव्यवस्था वाढीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक भारताने मानला आहे.

भारतात आम्ही नवी कार्य संस्कृती विकसित करत आहोत. नवी अर्थरचना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतात आज 70 हजाराहून अधिक स्टार्टअप आहेत. त्यातले 100 पेक्षा अधिक युनिकॉर्न म्हणजे एकमेवाद्वितीय आहेत.

भारतात आम्ही स्टार्टअप साठी एक इनोवेशन वर्किंग ग्रुप स्थापन करून त्याचा अभ्यास आणि अनुभव SCO सदस्य देशांना शेअर करण्याची आमचा मनसूबा आहे. यातून जागतिक पातळीवर आपल्या संघटनेतील तब्बल 40% असलेल्या लोकसंख्येला लाभ होईल.

SCO संघटनेचे सदस्य देश जगाच्या अर्थव्यवस्थेत 30 % योगदान देतात. या देशांमध्ये जगाची 40% लोकसंख्या राहते. SCO सदस्य देश आपापसात सहकार्य करून राहिले, तर जगाचा विश्वास आपण संपादन करू शकू आणि जागतिक पातळीवर आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात आपले भर योगदान अधिक भरीव करू शकू. भारत यासाठी आपला मौलिक वाटा उचलण्यास तयार आहे.

We want to transform India into manufacturing hub: PM Modi at SCO Summit

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात