जम्मू-काश्मीरमध्ये महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीदिनी यापुढे सार्वजनिक सुट्टी!


वृत्तसंस्था

जम्मू : जम्मू काश्मीरचे अखेरचे हिंदू महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीदिनी 23 सप्टेंबर रोजी इथून पुढे सार्वजनिक सुट्टी असणार आहे. जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. Maharaja Harisingh’s birth anniversary is henceforth a public holiday in Jammu and Kashmir

महाराजा हरिसिंग यांनी जम्मू-काश्मीर संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरण केले होते. त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करण सिंग यांनी जम्मू काश्मीर सरकारचे आभार मानले आहेत.

जम्मू काश्मीरच्या जनतेचे महाराजा हरिसिंग यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांनी स्त्री सक्षमीकरण, दलितोतद्धार, पंचायती राज यासारख्या सुधारणा आपल्या कारकीर्दीत जम्मू-काश्मीरमध्ये राबवल्या होत्या. त्याची आठवण ठेवून सरकारने त्यांचा जयंती दिन सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे याबद्दल मी काश्मीर प्रशासनाचे आभार मानतो असे करण सिंग यांनी म्हटले आहे.

महाराजा हरिसिंग यांनी 1935 मध्ये जम्मू काश्मीर मध्ये पंचायती राज धोरण लागू केले होते. त्या आधी 1931 मध्ये आपल्या राज्यात कायदा करून त्यांनी अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवली होती. त्याचबरोबर जमीन सुधार, शेती सुधार यांच्यासारख्या अन्य सामाजिक सुधारणा देखील त्यांनी राज्यात करून शेतकऱ्याला सावकाराच्या जोखडातून मुक्त केले होते.

Maharaja Harisingh’s birth anniversary is henceforth a public holiday in Jammu and Kashmir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात