वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धापासून भारताने धडा घ्यायला हवा. भविष्यातील युद्धासाठीही भारताने सज्ज राहण्याची गरज असून हे युद्ध स्वतःच्या शस्त्राने लढण्याची तयारी करण्याची गरज आहे, असे मत सरसेनाध्यक्ष मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. We have to rely on indigenously made weapons, Chief of Army Staff Manoj Narwane; Russia votes on the background of the Ukraine war
रशियाने युक्रेनवर हल्ला करून युद्ध लादले आहे. या पार्श्वभूमीवर नरवणे बोलत होते. ते म्हणाले, युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शस्त्रबळ अत्यावश्यक आहे. युद्धाच्या धामधुमीत ऐनवेळी शस्त्रसामग्री उपलब्ध होत नाही. शांततेच्या काळात शस्त्रसंग्रह आणि तयारी करून ठेवली तर कोणतेही युद्ध जिंकता येते. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत शस्त्र निर्मितीला त्यासाठीच तर प्रोत्साहन देण्यात आले. स्वदेशी बनावटीची शस्त्रे तातडीने निर्माण करता येतील. त्यामुळे ती जलदगतीने सैन्याकडे पोचविता येतील, हा त्या मागचा हेतू आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाचे उदाहरण देताना ते म्हणाले, रशियाकडे शस्त्राबळ मोठे आहे. त्या तुलनेत युक्रेन कमी पडला. त्याला अन्य देशांच्या युद्धसामग्रीची गरज भासत आहे. अशी परिस्थिती टाळण्यासाठी भारताला स्वदेशी युद्धसामग्रीवर भिस्त ठेवावी लागेल आणि त्याच्या आधारेच युद्ध लढावे लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App