कर्नाटकात राहुल गांधी प्रचार करणार, काँग्रेसला 2/3 बहुमत मिळणार; प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमारांचा दावा


वृत्तसंस्था

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याबरोबर भाजप काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही पक्षांनी मोठमोठे दावे करायला सुरुवात केली आहे. पण सगळ्यात मोठा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. कर्नाटकात राहुल गांधी प्रचाराला येणार आणि काँग्रेसला 2/3 दोन तृतीयांश बहुमत मिळणार असा शिवकुमार यांचा दावा आहे. We don’t need any alliance. Congress party will win its own. I am expecting a two-thirds majority.

कर्नाटका भाजपला कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी करण्याची गरज नाही पक्षाकडे पुरेशी नेते कार्यकर्ते आणि जनतेचे पाठबळ आहे राज्यात 40 % कमिशनचे सरकार सुरू आहे 10 मे हा मतदानाचा दिवस असल्याने त्या दिवशी 40 % कमिशन सरकारचा शेवटचा दिवस असेल त्यानंतर कर्नाटकात 13 मे रोजी निकालाच्या दिवशी काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळून पक्ष सत्तेवर येईल, असा दावा शिवकुमार यांनी केला आहे.

हेच ते शिवकुमार आहे ज्यांच्या रोडशो मध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पाचशे रुपयांच्या नोटा त्यांच्यावर उधळल्या होत्या. या शिवकुमार यांनी कर्नाटकात 40 % कमिशनचे सरकार संपवण्याचा दावा केला आहे.

पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिवकुमार यांनी कर्नाटकात राहुल गांधी प्रचाराला येणार आणि काँग्रेसला 2/3 बहुमत मिळणार, असा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधींनी आत्तापर्यंत अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला आहे, पण हिमाचल वगळता बाकी कोणत्याही राज्यात काँग्रेसला यश मिळू शकले नाही. हिमाचल प्रदेशात देखील काँग्रेसला साधे बहुमत मिळाले आहे. तेथे 2/3 बहुमत मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी राहुल गांधींच्या बळावर कर्नाटकात काँग्रेसला 2/3 बहुमत मिळेल, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

We don’t need any alliance. Congress party will win its own. I am expecting a two-thirds majority.

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!