आव्हाडांचे पूर्वीचे अंगरक्षक वैभव कदम यांचा मृत्यू म्हणजे मनसुख हिरेन 2.0!!; संशय वाढला


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे पूर्वीचे अंगरक्षक आणि अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात अटक झालेले मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबल वैभव कदम यांनी लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी आहे. पण दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या आहे. वैभव कदम म्हणजे मनसुख हिरेन 2.0 आहे. ते करमुसे प्रकरणात महत्वाचा साक्षीदार होते, असा दावा भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. Former bodyguard of jitendra avahad vaibhav Adam’s suspicious death

वैभव कदम यांना पोलिसांनी ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड सर्वात आधी तिथे पोहोचले आणि त्यांनी कदम यांचा मृतदेह ताबडतोब नातेवाईकांच्या हवाली करण्याची मागणी पोलिसांकडे केली, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिले आहे

वैभव कदम यांची ही शेवटची पोस्ट आहे, पोलीस आणि मीडियाला माझे विनंती आहे मी आरोपी नाही. त्यावर मोहित कंबोज यांनी अनेक ट्विट केली आहेत. आरोपी कोण? व्यवस्था कुणाला वाचवत आहे? आम्ही #SushantSinghRajput पुन्हा होऊ देऊ शकतो! हत्येला नेहमीच आत्महत्येचा चेहरा दिला जाऊ शकत नाही. आमच्याकडे आता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांना नि:ष्पक्ष तपास हवा आहे, हाय प्रोफाईल लोक नेहमी पळून जाणे सहन करू शकत नाही.

मनसुख हिरेन 2.0, हेडकॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम एसपीयू मुंबई आज सकाळी मृतावस्थेत सापडले! महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री संरक्षणात होते आणि एका प्रकरणात आरोपी होते आणि एका हाय प्रोफाइल प्रकरणात साक्षीदार होणार होते. इट इज अ क्लिअर कट मर्डर नॉट सुसाइड! मी एक्स्पोज करीन.

मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, वैभव कदम प्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवावा, आमचे रक्षण करणारे पोलीसच सुरक्षित नसतील किंवा त्यांना न्याय मिळत नसेल तर जनतेचे काय!

अशी एकापाठोपाठ एक ट्विट मोहित कंबोज यांनी केली आहेत. त्यामुळे वैभव कदम यांच्या संशयास्पद मृत्यू विषयी संशय आणखी वाढला आहे. वैभव कदम यांना ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड सर्वात प्रथम तिथे पोहोचले आणि त्यांनी वैभव कदम यांचा मृतदेह ताबडतोब त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

Former bodyguard of jitendra avahad vaibhav Adam’s suspicious death

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात