डर गए… अंगलट येताच राहुल गांधी घाबरले? सावरकरांवरील सर्व ट्विट डिलीट केल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!


राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे, शिवाय महाविकास आघाडीतील मित्र पक्ष ठाकरे गट नाराज असल्याचे दिसून आले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान केला. जाहीर पत्रकारपरिषदेत त्यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे,  सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही सावरकरांनी माफी मागितली याचे पुरावे दाखवा असे आव्हान राहुल गांधींना दिले आहे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमधील त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरून नाराजी व्यक्त केल्याने, आता प्रकरण अंगलट येत असल्यचे पाहत काँग्रेसने या मुद्य्यावर माघार घेतल्याचे दिसत आहे. एवढंच नाही तर, राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेले ट्वीट्सही डिलिट केले असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. Rahul Gandhi has deleted tweets about Veer Savarkar on social media

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेलं वक्तव्य आणि त्यावर शिवसेनेच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. भाजपला दूर करायचे असेल तर विरोधी पक्षांमध्ये फूट पडायला नको ही भूमिका घेण्यात आली आहे. सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळं राज्यात महाविकास आघाडीत फूट पडेल का? अशा प्रकारची चर्चा देखील सुरु झाली होती. पण यापुढे राहुल गांधी सावरकर यांच्यावर वादग्रस्त बोलणार नसल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

सोशल मीडियावर काही लोक असा दावा करत आहेत की, राहुल गांधी यांनी सर्वचस्तरातून टीका सुरू झाल्याने आणि विरोधी ऐक्यात फूट पडत असल्याचे पाहून त्यांनी वीर सावरकरांबद्दल केलेले ट्विट हटवले आहेत. या दाव्यासोबत अनेकज काही स्क्रीनशॉटही शेअर करत आहेत. अभियंता राजेश सिंह नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, “अरे चमचो! काय झालं? राहुलबाबांची हवा निघाली. वीर सावरकरांवरील सर्व ट्विट डिलीट केले. ये डर अच्छा लगा”. यासोबतच अनेकांनी अशाच आशायाचे ट्वीट केले आहेत.

राहुल गांधींना ‘मोदी’ आडनावाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याने त्यांना कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांनी केवळ संसदेचं सदस्यत्व गमावलं नाही, तर तुघलक रोड, दिल्ली गया, ल्युटियन्स येथे असलेला शासकीय बंगलाही त्यांना रिकामा करायला सांगण्यात आलं आहे.

दीप मणि त्रिपाठी नावाच्या युजरने लिहिले की, “राहुल गांधींनी वीर सावरकरांवर केलेल्या टिप्पणीवर, गुन्हा दाखल करण्याच्या चर्चेनंतर, राहुल गांधींनी सावरकरांचे ट्विट डिलीट केले. भीती चांगली आहे.”

तथापि, ऑनलाइन तपासणी केली असता राहुल गांधींनी त्यांचे कोणतेही ट्विट हटवलेले नसल्याचीह माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी वीर सावरकरांवरील ट्विट हटवल्याची चर्चा ही अफवा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वीर सावरकरांबद्दल त्यांनी ट्विट केले नसावे अशीही शक्यता आहे. त्यामुळेच ते ट्विटरवर दिसत नाही, कारण त्यांनी बहुतेक पत्रकार परिषदा-रॅलींमध्ये अशी विधाने केली आहेत आणि हे सर्व पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केले गेले आहेत.

Rahul Gandhi has deleted tweets about Veer Savarkar on social media

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात