वृत्तसंस्था
लंडन : युद्धनौका आणि ब्रिटिश सैन्याबाबत माहिती असणारी ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाची काही गोपनीय कागदपत्रे एका बस थांब्यावर सापडल्याचे वृत्त येथील माध्यमांनी प्रसिद्ध केले. ही कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार गेल्याच आठवड्यात संरक्षण मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याने केली होती. war documents found on bus stop in Briton
बस थांब्यावर सापडलेल्या या कागदपत्रांमध्ये ब्रिटनच्या अफगाणिस्तानमध्ये असलेल्या सैन्याची स्थिती आणि भविष्यातील योजना याबाबत विश्लेिषण होते, तर काही कागदपत्रांमध्ये रशियाबाबत गोपनीय माहिती होती. याशिवाय या कागदपत्रांमध्ये रॉयल नेव्हीच्या ‘टाइप ४५’ विनाशिका, एचएमएस संरक्षण प्रणाली आणि इतर काही युद्धसामग्रीबाबतही अत्यंत संवेदनशील माहिती होती. तसेच, अनेक महत्त्वाचे ईमेल आणि पॉवर पाइंट प्रेझेंटेशनचाही कागदपत्रांमध्ये समावेश होता. बस थांब्यावर एका व्यक्तीला अशी माहिती असलेल्या ५० कागदपत्रांचा गठ्ठा सापडला. या कागदपत्रांवर गोपनीय असा शिक्का मारण्यात आला होता.
संबंधित व्यक्तीने तातडीने ‘बीबीसी’च्या कार्यालयाशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. एका वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या कार्यालयातून ही कागदपत्रे बाहेर आल्याची शक्यता ‘बीबीसी’ने व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App