राहुल गांधींच्या पुढे जाऊन वडेट्टीवार कन्येकडून सावरकरांची बदनामी; म्हणे, बलात्काराला सावरकरांनी बनविले राजकीय हत्यार!!

प्रतिनिधी

मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी बदनामी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधींना राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर पाठवले हे खरे, पण सावरकरांची बदनामी करण्याचा राहुल गांधींनी चालू केलेला सिलसिला बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याही पुढे जाऊन अजून सुरू ठेवला आहे. यामध्ये आता माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्येची भर पडली आहे. Vijay wadettiwar’s daughter shivani wadettiwar defamation of savarkar

फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करणाऱ्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका मेळाव्यात सावरकरांची बदनामी केली आहे. शिवसेना-भाजपने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेच्या विरोधात बोलताना शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना-भाजप कधीच फुले शाहू आंबेडकर गौरव यात्रा काढणार नाही. ते फक्त सावरकरांचीच गौरव यात्रा काढतील. पण माझ्यासारख्या महिला भगिनीला त्यामुळे कसे सुरक्षित वाटेल? कारण सावरकरांनी आपल्या विरोधकांविरुद्ध बलात्कारासारख्या राजकीय हत्याराचा वापर करायचे आदेश दिले होते, असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी तारस्वरात केला आहे. शिवानी वडेट्टीवार सध्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे हे बेछूट भाषण सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Vijay wadettiwar’s daughter shivani wadettiwar defamation of savarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात