मराठमोळ्या विद्या कुलकर्णी यांची CBI संयुक्त संचालकपदी निवड


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : एकेकाळी पुणे सीबीआय साठी काम केलेल्या आणि सध्या तमिळनाडू मधील आयपीएस म्हणून काम पाहणाऱ्या विद्या कुलकर्णी यांची केंद्रीय अन्वेषण विभागात संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत आणि सध्या त्या तामिळनाडू येथे आयपीएस अधिकारी म्हणून काम पाहतात. 1998 च्या बॅचमधील तमिळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी त्या आहेत. पुढील पाच वर्षांकरिता त्या सीबीआयच्या संयुक्त संचालकपदी काम पाहणार आहेत.

Vidya Kulkarni as CBI Joint Director

विद्या कुलकर्णी यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील तेऱ्हे हे आहे आणि त्यांचे सासरे औरंगाबादचे आहे. त्यांचे वडील स्टेट बँकेमध्ये अधिकारी होते. त्यांचे सर्व प्राथमिक शिक्षण तेऱ्हे येथेच पार पडले. तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी बार्शी आणि सोलापूर येथून पूर्ण केले आहे. सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी बी इ ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सोशल स्टडीजमधून पिणे विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आणि त्या नंतर यूपीएससीच्या तयारीला त्या लागल्या.


इंडो-पॅसिफिकची सुरक्षा, कोरोना लस, क्वाड फेलोशिप, जाणून घ्या क्वाड नेत्यांच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली सहमती


वाचनाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. तसेच पाेलिस गणवेशाचे आकर्षण देखील त्यांना आधीपासूनच होते. त्यामुळे त्यांनी झोकून देऊन यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. या सर्व प्रवासामध्ये त्यांच्या घरच्यांचे पूर्ण सहकार्य मिळाले. त्यामुळे त्या हे ध्येय गाठू शकल्या.

Vidya Kulkarni as CBI Joint Director

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”