Vedanta-Foxconn : गुजरात मधली गुंतवणूक ही तर सुरुवात, महाराष्ट्रासह देशभर उभारणार जाळे!!; अनिल अग्रवालांची ग्वाही


प्रतिनिधी

नवी दिल्ली : ज्या वेदांत – फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुंतवणूकीवरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उठला आहे, त्याविषयी वेदांताचे सीईओ अनिल अग्रवाल यांनी अनेक खुलासे केले आहेत. गुजरात मधली 1 लाख 54 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प ही तर सुरुवात आहे. आम्ही महाराष्ट्र सह संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादनांचे जाळे उभारू इच्छितो आणि यापेक्षाही मोठी गुंतवणूक त्यासाठी लागेल ती करू इच्छितो, असे अनिल अग्रवाल यांनी विविध ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.Vedanta-Foxconn: Investment in Gujarat is the beginning, network will be set up across the country including Maharashtra!!; Testimony of Anil Aggarwal



अनिल अग्रवाल यांची ट्विटस्

आत्मनिर्भर भारताची सिलिकॉन व्हॅली निर्मितीची आमची महत्त्वाकांक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि समस्त भारतीयांचे कौशल्य आणि कमिटमेंट यातून हे स्वप्न साकार होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

गुजरात मधल्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी 1.54 लाख रुपयांची गुंतवणूक ही सुरुवात आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रामध्ये अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक यामध्ये होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक ही राज्ये यात फार महत्त्वाची भूमिका बजावतील. संपूर्ण देशभर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणारी इकोसिस्टीम उभारण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा असेल.

गुजरात मध्ये प्रकल्पाची जागा आम्ही काही महिने आधी निश्चित केली होती. परंतु, जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारशी झालेल्या वाटाघाटींमध्ये इतर राज्यांपेक्षा त्यांनी आम्हाला अधिक सवलती देऊ केल्या होत्या. परंतु कुठेतरी सुरुवात करायची होती आणि आम्ही शास्त्रीय आधारावर आणि स्वतंत्र व्यावसायिक सल्ल्यानुसार गुजरातची निवड केली.

गेली दोन वर्षे आमची प्रोफेशनल्सची टीम आणि एजन्सीज गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू यांच्या सरकारांबरोबर चर्चा करते आहे. त्याच वेळी केंद्र सरकारशीही आमचा समन्वय आहे. सर्व सरकारांनी आम्हाला उत्तम सहकार्य केले आहे.

वेदांत – फॉक्सकॉन करणार असणारी गुंतवणूक अब्जावधी डॉलर्सची आहे. यासाठी शास्त्रीय आणि आर्थिक प्रक्रिया फार मोठी तसेच दीर्घकालीन आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातही गुंतवणूक करण्याचा आमचा इरादा आणि वादा आहे.

सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादन क्षेत्रात वेदांत आणि फॉक्सकॉन करत असलेली ही गुंतवणूक संपूर्ण देशावर छोट्या-मोठ्या उद्योगांचे जाळे पसरवेल. आत्मनिर्भर भारतासाठी ही स्वतःची सिलिकॉन व्हॅली असेल.

Vedanta-Foxconn: Investment in Gujarat is the beginning, network will be set up across the country including Maharashtra!!; Testimony of Anil Aggarwal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात