लखीमपूर प्रकरणावर वरुण गांधींचे भाष्य, म्हणाले – हिंसेला हिंदू विरुद्ध शीखमध्ये रंग देण्याचा प्रयत्न अनैतिक!


 

भाजप खासदार वरुण गांधी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारापासून सरकारला सतत लक्ष्य करत आहेत. लखीमपूर हिंसाचारानंतर वरुण गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली होती. आज पुन्हा वरुण गांधी यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे.Varun Gandhi Said Attempt To Turn Lakhimpur Kheri Into Hindu Vs Sikh Battle Is Dangerous


प्रतिनिधी

लखनऊ : भाजप खासदार वरुण गांधी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारापासून सरकारला सतत लक्ष्य करत आहेत. लखीमपूर हिंसाचारानंतर वरुण गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली होती. यासोबतच या मुद्यावर योगी सरकारला पत्रही लिहिले होते. याआधीही त्यांनी उसाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगींना पत्र लिहिले होते. आज पुन्हा वरुण गांधी यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे.

रविवारी भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर हिंसाचारावरून योगी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीट केले की, लखीमपूर खेरी हिंसाचाराचे हिंदू विरुद्ध शीख संघर्षात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वरुण गांधी म्हणाले की, “असे करण्याचा प्रयत्न केवळ अनैतिकच नाही तर त्या जखमांवरची खपली पुन्हा काढणे आहे ज्या भरण्यासाठी अनेक पिढ्यांचा काळ लागल्या. ते म्हणाले की, आपण राजकीय एकतेचा फायदा राष्ट्रीय एकतेपेक्षा वर ठेवता कामा नये.”

शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी वरुण गांधींचे ट्विट

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक घटनेनंतर वरुण गांधी सातत्याने शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी ट्विट करत आहेत. त्यांनी या संदर्भात योगी सरकारला पत्रही लिहिले आहे आणि पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Varun Gandhi Said Attempt To Turn Lakhimpur Kheri Into Hindu Vs Sikh Battle Is Dangerous

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात