देशात ३६ कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस, लसीकरणाचा वेग धीमा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात ठरवलेल्या उद्दिष्ठापेक्षा सरासरी ५४ टक्के कमी लसीकरण झाले आहे. दिल्लीत ठरवलेल्या ध्येयापेक्षा २२ टक्क्यांनी लसीकरण कमी झाले आहे. त्याचवेळी बिहारमध्ये ७१ टक्के तर राजस्थान आणि पश्चिेम बंगालमध्ये ६६ टक्के कमी लसीकरण झालेले आहे. Vaccination speed becomes slow

आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत देशात ३६ कोटीहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ११ कोटीहून अधिक नागरिकांना डोस दिले आहेत. केरळ आणि दिल्लीबरोबरच पंजाब, कर्नाटक आणि गुजरातमध्ये लसीकरण कमी झाले आहे.पंजाबमध्ये लसीकरण अजूनही २६ टक्के कमीच असून कर्नाटकमध्ये ३० टक्के तर गुजरातमध्ये ३७ टक्के लसीकरण कमी झाले आहे. दिल्ली आणि केरळमध्ये लसीकरणाची टक्केवारी सर्वाधिक आहे. परंतु डिसेंबरपर्यंत देशभरातील ६० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याच्या निश्चि्त केलेल्या ध्येयापासून हे दोन्ही राज्ये खूपच दूर आहेत.

बिहार, राजस्थान, बंगालबरोबरच उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील लसीकरण ध्येयापेक्षा खूपच कमी आहे. उत्तर प्रदेशमध्ये अपेक्षेपेक्षा ६४ टक्के तर झारखंडमध्ये ६२ टक्क्यांनी लसीकरण कमी झाले आहे.

Vaccination speed becomes slow

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण