लसीकरणाचे जगभरातील असमान प्रमाण चिंताजनक, आरोग्य संघटनेचा इशारा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : येत्या सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान दहा टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) अध्यक्ष डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी केले आहे.The unequal rate of vaccinations around the world is worrying, the health organization warns

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालानुसार लसीकरणाची टक्केवारी काही देशांत एका टक्क्याच्या खाली, तर काही देशांत ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे असमान प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगून घेब्रेयेसूस यांनी कोरोना रोखण्याचा आणि जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा सर्वोत्तम मार्ग लसीकरण असल्याचे आवर्जून नमूद केले.इंडिया ग्लोबल फोरममध्ये त्यांनी ऑनलाइन भाग घेतला. वर्षाअखेर ४०, तर पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ७० टक्के लसीकरण पूर्ण झालेले असावे. त्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न व्हावेत असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, लशीच्या उपलब्धतेतील असमानतेमुळे काही देशांतील टक्केवारी वाढली आहे, तर इतर अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचारी, वृद्ध नागरिक आणि संसर्गाचा धोका असलेल्या वर्गांना देण्यासही पुरेशी लस नाही. जोपर्यंत प्रत्येक ठिकाणचा संसर्ग संपुष्टात येत नाही तोपर्यंत कोणतेच ठिकाण सुरक्षित नसेल.

The unequal rate of vaccinations around the world is worrying, the health organization warns

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी