अफगाणिस्तानला पुन्हा तालिबानचा विळखा, अनेक जिल्हे दहशतवाद्यांच्या ताब्यात


विशेष प्रतिनिधी

काबूल : अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या आणि इतर नाटो देशांच्या फौजा मायदेशी परतत असताना तालिबानने आपले सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील गावे आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अफगाणी सैन्याकडून काही जिल्ह्यांचा ताबा मिळविला आहे. Afghanistan again under Taliban control, several districts under terrorist control



अफगाणिस्तानचे अनेक सैनिक सीमा पार करून ताजिकिस्तानात पळून गेले आहेत. ताजिकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी आक्रमण सुरु करतानच अफगाणिस्तानचे तीनशेहून अधिक सैनिक पळून जात ताजिकिस्तानात घुसले आहेत. ताजिकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मानवातावादी दृष्टीकोनातून या सर्वांना प्रवेश देत आश्रय दिला आहे.

तालिबानला अनेक जिल्ह्यांचा ताबा कोणताही संघर्ष न करताच मिळाला. दहशतवाद्यांच्या टोळ्या येताच अफगाणी सैनिकांनी गावातून पळ काढला. दहशतवाद्यांच्या तुलनेत सैनिकांची संख्या अत्यंत कमी असल्याने आणि त्यांच्याकडे पुरेशी शस्त्रे व दारुगोळाही नसल्याने त्यांचे नीतीधैर्य खचले असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या तीन दिवसांत तालिबानच्या ताब्यात आलेल्या १० जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्ये मिळविताना त्यांना कोणताही विरोध झाला नाही.

Afghanistan again under Taliban control, several districts under terrorist control

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात