भारतात दर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढे लसीकरण, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले लसीकरण मोहीमेचे कौतुक


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारताच्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले आहे. भारतात दर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येइतक्या लोकांचे लसीकरण होत आहे, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.Vaccination for the entire population of Australia every three days in India, industrialist Anand Mahindra praises vaccination campaign

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. विविध सामाजिक विषयांवर आपली मते मांडत असतात. अनेक वेळा सरकारच्या धोरणावर टीकाही करतात. मात्र, भारतामध्ये वेगाने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचे त्यांनी कौतुक केले आहे.



आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की आपल्या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करणे अवघड काम आहे. परंतु, मी चुकत नसेल तर भारतात दर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढ्या लोकांचे लसीकरण होत आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत भारताने मंगळवारी विक्रम केला होता. देशात ३१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जवळपास १,३०,८४,३४४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. एका दिवसातील आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट करत दिली होती.

भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आज १.३० कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतपर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे. यापूर्वी एक कोटी लसीकरणाचा विक्रम झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: ट्वीट करून देशवासियांना माहिती दिली होती.

भारतामध्ये लसीकरणाचा वेग कमी असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जाते. यासाठी वेगवेळ्या देशांची टक्केवारी देऊन तुलना केली जाते. परंतु, जगातील बहुतांश देशांची लोकसंख्या भारताच्या दहा टक्केही नाही. त्याचाच संदर्भ आनंद महिंद्रा यांनी दिला आहे.

ऑ स्ट्रेलियाची लोकसंख्या सुमारे तीन कोटी आहे. भारतामध्ये तीन दिवसांतच तीन कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले. याचा अर्थ संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येला तीन दिवसांत लस दिली गेली असती.

Vaccination for the entire population of Australia every three days in India, industrialist Anand Mahindra praises vaccination campaign

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात