वृत्तसंस्था
कॅलिफोर्निया : पृथ्वीच्या दिशेने सौरवादळ झेपावत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला असून या वादळामुळे जगभरातील इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. Be careful! The solar storm is blowing towards the earth; Greater risk of Internet service disruption
कॅलिफोर्निया विद्यापीठ, इर्विनच्या संगीता अब्दु ज्योती यांनी आपला या संदर्भातील शोधनिबंध नुकताच सादर केला. तिच्या संशोधनानुसार , सौरवादळामुळे स्थानिक आणि प्रादेशिक इंटरनेट पायाभूत सुविधांमध्ये फायबर ऑप्टिक वापरतात. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होणार नाही. परंतु इंटरनेट सेवा विस्कळीत निश्चित होतील. संगीता अब्दु ज्योती यांनी गेल्या आठवड्यात SIGCOMM 2021 डेटा कम्युनिकेशन कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिली.
महाद्वीप इंटरनेटने जोडण्यासाठी समुद्राखाली केबल्स टाकल्या आहेत.त्यापैकी बहुतेक फायबर ऑप्टिक केबल्सने जोडल्या आहेत. जोडणीत करंट वाढवणारे काही अंतराने रिपीटर्स बसविलेले असतात. ते अतिसंवेदनशील असतात. त्यांना सौर वादळामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
जर नेटवर्कवरील हे रिपीटर्स ऑफलाईन झाले तर फक्त समुद्राखालून केबलमधून दिल्या जाणाऱ्या इंटरनेटवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेले इंटरनेटसेवाना फटका बसेल. इंटरनेट ब्लॅकआउट होऊ शकते.
पृथ्वीला सौरवादळाचा फटका अनेकदा बसला आहे. यापूर्वी १८५९, १९२१ मध्ये तीव्र सौर वादळे आली होती. सर्वात अलीकडे ते १९८९ मध्ये आले होते. त्याचा मोठा फटका ईशान्य कॅनडाला बसला होता. अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला आहे.
सौर वादळाला तोंड कसे देणार …
पृथ्वीवर दुसरे सौर वादळ आले तर परिणामांना सामोरे जाण्यासाठी मानव कमी पडणार आहे. कारण त्याला तोंड कसे द्यायचे? ,याची माहिती नसून त्यासाठी तयारी केलेली नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App