विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबईतील ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून जवळपास ३० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.४५ वर्षांवरील ७३ टक्के नागरिकांचा पहिला डोस आणि ४७ टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. एक मार्चपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने या वयोगटात दुसरा डोस घेण्याचे प्रमाण जास्त आहे, Vaccination drive is very fast in Mumbai
तर दुसरा डोस घेण्यात सर्वात कमी प्रमाण हे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे आहे.मुंबई पालिकेला गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पावणेपाच लाख लशींचा पुरवठा राज्य सरकारमार्फत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे.
राज्याकडून कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे मिळून ६३ लाख डोसउपलब्ध झाले आहेत; तर त्यापैकी जवळपास पावणेपाच लाख हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाले आहेत. जुलै महिन्यात नऊ लाख ८३ हजार, ऑगस्ट महिन्यात नऊ लाख ८६ हजार आणि सप्टेंबरच्या ६ तारखेपर्यंत चार लाख ७७ हजार डोस मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App