कोरोना लसीकरणात उत्तर प्रदेशाचे रेकॉर्ड; एका दिवसात ३८ लाखांवर लोकांना डोस


वृत्तसंस्था

लखनौ : कोरोना लसीकरण मोहिमेत उत्तर प्रदेशाने रेकॉर्ड केले. एका दिवसात ३८ लाखांवर लोकांना लसीचे डोस देऊन विक्रम केला आहे.Uttar Pradesh record in corona vaccination

याबाबतची माहिती मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्वतः मंगळवारी ट्विट करून दिली आहे. ते म्हणतात, ‘आपले यूपी रेकॉर्डच्या मार्गावर’ आदरणीय पंतप्रधान यांची प्रेरणा आणि @UPGovt यांच्या सहकार्याने कोविड लसीचे ३८ लाख ४३ हजार ५३१ डोस राज्यात दिले गेले. हा राज्याच्या वचनबद्धतेचा परिणाम आहे. कोणत्याही राज्यात तुलनेत उत्तप्रदेशाने आतापर्यंत एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने केलेले लसीकरण आहे. विजयाची लस नक्की घ्या!’

लसीचा डोस वाचवेल जीव

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी कोरोनाची लस हा एक प्रभावी आणि उत्तम उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीचे डोस घेतले पाहिजेत. विशेष म्हणजे लस सरकार सरकार तर्फे मोफत दिली जात आहे. त्याचा लाभ नागरिकानी घेऊन स्वतःला सुरक्षित केले पाहिजे.

Uttar Pradesh record in corona vaccination

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण