विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठले आहेत. डिझेलच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढ झाली; तर जवळपास दोन महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोलचे भावही २० पैशांनी वाढले.Petrol prices hiked once again
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार महानगरांच्या तुलनेत मुंबईतील इंधन सर्वाधिक महागडे आहेत. मुंबईत पेट्रोल सध्या १०७.४७ रुपये प्रतिलिटर आहे; तर डिझेल ९७.२१ रुपये प्रतिलिटर आहे. त्यांतर दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये प्रतिलिटर आहे; तर डिझेल ८९.५७ रुपये प्रतिलिटर आहे.
बहुतांश देशांमध्ये कोविड संसर्ग आटोक्यात येत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे उद्योगधंदे हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे; मात्र तेलपुरवठादार असलेल्या ओपेक देशांमध्ये अजूनही बऱ्यापैकी कोविड निर्बंध आहेत.
त्यामुळे मागणीच्या तुलनेत त्यांच्याकडून कच्च्या तेलाचे उत्पादन होत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाचे दर गेल्या तीन वर्षातील उच्चांकी पातळीवर गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App