पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहणार, कोरोनाच्या भितीने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट


विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता तसेच अनेक देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सलग तीन दिवसांपासून घट होत आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत ६९.९० डॉलर प्रति बॅरल आहे. त्यामुळे देशातही पुढील काही दिवस इंधनाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.Oil rates will stays same in coming days

देशभरात पेट्रोलच्या किमतींनी शंभरी केव्हाच पार केली असून डिझेलही शंभरीच्या जवळ पोहोचले होते; मात्र गेल्या ३० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसल्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तरीदेखील महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक असल्याने नागरिकांना याचा फटाका बसत आहे.



मुंबईत सध्या पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७ रुपये आहे; तर दिल्लीत १०१.८४ रुपये, कोलकातामध्ये १०२ रुपये असे दर आहेत. मुंबईत डिझेलची किंमतही सर्वाधिक ९७.४५ रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत डिझेलचे प्रतिलटर दर रविवारी ८९.८७ रुपये व कोलकातामध्ये ९३ रुपये असे होते.

Oil rates will stays same in coming days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात