उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले आयसोलेट, मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव


उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने योगी आदित्यनाथ यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सर्व कामे व्हर्च्युअली करतील.Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath became isolated, corona infestation in CM’s office staff


विशेष प्रतिनिधी 

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने योगी आदित्यनाथ यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सर्व कामे व्हर्च्युअली करतील.

योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात ट्विटर करून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की माझ्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना संक्रमित झाले आहेत. हे अधिकारी माझ्या संपर्कात होते, त्यामुळे खबरदारी म्हणून मी स्वत:ला आयसोलेट केले आहे



आणि सर्व कामे व्हर्च्युअली सुरू करत आहे.उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत येथे तब्बल 18,021 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी ही माहिती दिली. गेल्या 24 तासांत 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी राज्यात 11 एप्रिलला एका दिवसात सर्वाधिक 15,353 नवे कोरोबाधित आढळून आले होते.

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath became isolated, corona infestation in CM’s office staff

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात