वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकार विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीची गरज असताना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए अध्यक्षपदाचा वाद उकरून काढून विरोधी ऐक्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला काँग्रेसचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला आहे.UPA Chairperson: Attempt to undermine the unity of the opposition by digging up the controversy over the UPA presidency; Mallikarjun Kharge lashes out at Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात नवी दिल्लीत करण्यात आला होता. शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांनी देखील शरद पवार यांच्या युपीए अध्यक्षपदाचा मुद्दा लावून धरला आहे. यापार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार यांना टोला लगावला आहे.
भाजप सरकार विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकजूट जास्त महत्त्वाची आहे. कोण कोणते पद स्वीकारणार किंवा कोणाला कोणते पद मिळणार अथवा मिळणार नाही, हा वादाचा विषय ठरू शकत नाही. यूपीएच्या अध्यक्षपदी सध्या सोनिया गांधी आहेत. त्यामुळे यूपीए अध्यक्षपदाचा नवा वाद उकरून काढून विरोधी पक्षांच्या ऐक्यात खोडा घालण्याचे काम काही लोक करत आहेत, असे शरसंधान मल्लिकार्जुन खरगे यांनी साधले आहे.
शरद पवार यांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत आपल्याला यूपीए अध्यक्ष पद रस नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, तरी देखील आज दिल्लीतच पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पवारांच्या यूपी अध्यक्षपदाच्या विषयाला उकळी दिली. यापार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार आणि राऊत यांना राजकीय टोला लगावल्याचे मानले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App