लखीमपूर’च्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने नेमला एक सदस्यीय आयोग


विशेष प्रतिनिधी

अलाहाबाद – लखीमपूर खेरी हिंसाप्रकरणाच्या चौकशीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या एकसदस्यीय आयोग नियुक्त केला असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले.UP govt. orders enquiry in lakhimpur case

लखनौ विभागाचे पोलिस महानिरीक्षक लक्ष्मीसिंह म्हणाले की, न्यायालयीन आयोग या प्रकरणाची चौकशी करून दोषारोप न्यायालयात दाखल करेल.लखीमपूरमध्ये मोटारीने चिरडल्याने शेतकऱ्यांसह आठजण ठार झाल्याची घटना रविवारी घडली.आयोग दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करेल, असे राज्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या चार शेतकऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत त्यांच्या कुटुंबीयांनी टिकोनिया येथील घटनास्थळी काचेच्या पेटीत मृतदेह ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वा सन राज्य सरकारने दिले होते.

UP govt. orders enquiry in lakhimpur case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”