विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमधील शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडल्याच्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली. यासंदर्भात पोलिसांच्या ‘एफआयआर’मध्ये नोंदविलेल्या आरोपींची नावे व त्यांना अटक झाली की नाही, याचा स्थितीजन्य अहवाल सादर करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला न्यायालयाला दिला आहे.Supreme Court orders to submit a report
सरन्यायाधीश रमणा यांनी याची आज स्वतःहून दखल घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) आणि न्यायालयीन चौकशी आयोग नेमला असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. त्यावर या दोन्ही यंत्रणांच्या तपासाची माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
‘‘या घटनेत आठ व्यक्ती त्यातील काही शेतकरी, एक पत्रकार आणि अन्य एक जण मारले गेले आहेत हे तुम्ही स्वतः सांगितले आहे, कागदपत्रांमध्येही हा उल्लेख आहे आणि आम्हाला मिळालेल्या याचिकादाराच्या पत्रातही नमूद केले आहे.
अशा भिन्न व्यक्तींचा खून करणाऱ्या या सर्व दुर्दैवी घटना आहेत,’’ असे मत खंडपीठाने व्यक्त केले. या घटनेकडे तुम्ही गंभीरपणे पाहत नसल्याची व ‘एफआयआर’ नीट दाखल न केल्याची तक्रारी असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App