यूपी फिरसे मॉँगे भाजपा सरकर, सपाच्या अखिलेय आये ला भाजपाने दिले या गाण्याने उत्तर


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : प्रयागराज से मथुरा, काशी तकलखनऊ से लेकर झांसी तक
अयोध्या से बिठूर तकशहर-गांव सब दूर-दूर तक
गाजीपुर से गाजियाबाद से यूपी भर में शंखनाद सेसुनाई पड़ती है यही हुंकार
यूपी फिर मांगे भाजपा सरकार फिर से बीजेपी
या गाण्याद्वारे भारतीय जनता पक्षाने समाजवादी पक्षाच्या अखिलये आये या गाण्याला उत्तर दिले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या निवडणूक प्रचाराला धार देण्यासाठी एक नवे गाणे लाँच केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक गीत रिलीज केले. भाजपच्या उत्तर प्रदेश ट्विटर हँडलवरून ट्विट करून पक्षाने ही माहिती दिली.Up Firse mange bhajpa sarkar, answer to sps Akhilesh aaye songया थीम साँगच्या सुरुवातीच्या सीनमध्येच अयोध्येचे भव्य राम मंदिर दाखवण्यात आले असून, मेट्रो ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ एकत्र दिसत आहेत. संपूर्ण गाण्यादरम्यान मोठ्या आवाजात ढोलही वाजत आहे.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, भाजपने आपल्या निवडणूक सामग्रीसोबतच थीम सॉंगदेखील जारी केले. मी या गाण्याला आवाज देण्याऱ्याचे आणि हे गाणे यशस्वीपणे तयार करण्यासाठी मेहनत घेणाºया संपूर्ण टीमचे आभार मानतो. पाच वर्षांपूर्वी आम्ही आमचा लोककल्याणाचा संकल्प घेऊन वाटचालीला सुरुवात केली होती.

त्यावेळी आम्ही राष्ट्रवाद, विकास आणि सुशासन या मागार्ने ध्येय गाठण्याचा संकल्प केला होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, आमच्या पक्षाने जे संकल्प केले होते, ते सर्व भाजप सरकारने पूर्ण केले आहेत. उत्तर प्रदेशातील आमच्या सरकारने सुरक्षिततेचे उत्तम वातावरण निर्माण केले आहे.

याशिवाय राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या संधीही उपलब्ध केल्या. पंतप्रधानांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे आम्ही आमचे ब्रीदवाक्य बनवे आणि त्यानुसार कार्य केले.

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!