वृत्तसंस्था
लखनऊ : मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित होते. यावेळी अपर्णा यादव म्हणाल्या की, माझ्यावर नेहमीच भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव राहिला आहे. यादव म्हणाल्या की, मी पंतप्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. माझ्या कुवतीनुसार जे काही काम करता येईल ते करेन. माझ्यासाठी राष्ट्रधर्म सर्वोच्च असून आता मी राष्ट्राचे कार्य करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
तर दुसरीकडे केशव प्रसाद मौर्य यावेळी म्हणाले की, अखिलेश यादव हे आपल्याच घरात अपयशी आहेत. या प्रसंगी मला अधिक काही बोलायचे नाही. ते म्हणाले की, समाजवादी पक्षाने आमच्या सर्व योजनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी अद्याप आपली जागा जाहीर केलेली नाही. मौर्य म्हणाले की, भाजपने पहिल्याच यादीत माझी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जागा जाहीर केली आहे. विकास केल्याचे अखिलेश यादव म्हणाले होते. त्यांचा एवढा विकास झाला असेल, तर त्यांना सुरक्षित जागा मिळायला एवढा वेळ का लागतोय. निवडणुकीची अधिसूचना निघूनही त्यांना इतका वेळ लागत आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह डझनहून अधिक आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर याकडे भाजपचा पलटवार म्हणून पाहिले जात आहे. भाजपने आता मुलायम घराण्यात फूट पाडली आहे. यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन अनेकांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. याच धर्तीवर अपर्णा यादव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh Yadav's daughter-in-law joins BJP #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/ZEkd9wD2LV — ANI (@ANI) January 19, 2022
Former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh Yadav's daughter-in-law joins BJP #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/ZEkd9wD2LV
— ANI (@ANI) January 19, 2022
अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. अपर्णा यांनी 2017 मध्ये लखनऊ कँटमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून अपर्णा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App