दिंडोरी, निफाडमध्ये शिवसेना, सुरगाणा देवळ्यात भाजपची बाजी!!


विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली आहे, तर दिंडोरी, निफाडमध्ये 17 पैकी 7 जागा मिळवून शिवसेना नंबर एकवर आहे. Shiv Sena in Dindori, Niphad, BJP’s victory in Surgana temple !!

नाशिक जिल्हात एकूण सहा नगरपंचायतीसाठी निवडणूक होत असून, दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. विशेष म्हणजे दिंडोरी हा डॉ. भारती पवार यांचा लोकसभा मतदारसंघ असून, त्यांचे येथे मजबूत जाळे आहे.



सुरगाणा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 जागा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक आठ जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेने सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. देवळा येथेही भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. या ठिकाणी एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी 15 जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. एकंदर या दोन्ही नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

निफाड नगरपंचायतीमध्ये अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बाजी मारली असून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का दिला आहे. नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी सात जागा या शिवसेनेने पटकावल्या आहेत. शहर विकास आघाडीने 4 जागा पटकावल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर बसप आणि इतरांना प्रत्येकी एकेक जागा मिळाली आहे. मात्र, या ठिकाणी शिवसेना सहजपणे सत्तेत येऊ शकते हे नक्की.

सुरगाणा नगरपंचायत

एकूण जागा – 17

भाजप – 08

शिवसेना – 06

माकप – 02

राष्ट्रवादी काँग्रेस – 01

देवळा नगरपंचायत

एकूण जागा – 17

भाजप – 15

राष्ट्रवादीला – 2

निफाड नगरपंचायत

एकूण जागा – 17

शिवसेना- 07

शहर विकास आघाडी – 04

राष्ट्रवादी काँग्रेस- 03

काँग्रेस – 01

बसपा- 01

इतर (अपक्ष )- 01

Shiv Sena in Dindori, Niphad, BJP’s victory in Surgana temple !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात