सोमवारी अबुधाबीमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय ठार, ओळख पटली असून पार्थिव लवकरात लवकर पाठवणार


विशेष म्हणजे यूएईमध्ये सुमारे ३५ लाख भारतीय असून तेथील परदेशी नागरिकांत ही संख्या सर्वाधिक आहे. Two Indians have been identified in a drone strike in Abu Dhabi on Monday


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अबुधाबीमध्ये सोमवारी झालेल्या संशयित ड्रोन हल्ला झाला होता.दरम्यान या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.दरम्यान हल्ल्यात ठार झालेल्या दोन भारतीयांची ओळख पटली असून त्यांचे पार्थिव भारतात पाठविले जाणार आहे, तसेच याच घटनेत एका पाकिस्तानी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.अशी माहिती संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावासातर्फे मंगळवारी देण्यात आली.ठार झालेल्या दोन भारतीयांचे पार्थिव भारतात लवकरात लवकर पाठविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि यूएईमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यूएईमध्ये सुमारे ३५ लाख भारतीय असून तेथील परदेशी नागरिकांत ही संख्या सर्वाधिक आहे. अबुधाबीत एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के, तर यूएईत ३० टक्के भारतीय आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासातर्फे देण्यात आली.

Two Indians have been identified in a drone strike in Abu Dhabi on Monday

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!