नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा एक नंबर राष्ट्रवादीने काँग्रेस – शिवसेनेला मागे ढककले!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणुकीत भाजपने प्रथम क्रमांक राखला असून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेला मागे ढकलले आहे. एकूण 105 नगरपंचायतीच्या निवडणूक पैकी 65 नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 18 नगरपंचायती जिंकून भाजपने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीने 16 नगरपंचायती जिंकल्या आहेत. काँग्रेसने 14, तर शिवसेनेने 12 नगरपंचायती जिंकल्या आहेत. In the Nagar Panchayat elections, BJP’s number one NCP pushed Congress-Shiv Sena back !!

विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिला नंबर मिळवला होता. त्याखालोखाल शिवसेनेचा नंबर होता. परंतु आता नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे घसरण झाली असून शिवसेनेला चौथ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे.कवठेमहांकाळ नगरपंचायत आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी जिंकली आहे तर कर्जत नगरपंचायत रोहित पवार यांनी जिंकली आहे. बच्चू कडू यांनी देखील संग्रामपूरची नगरपंचायत आपल्या ताब्यात ठेवली असून अनेकांनी आपापल्या प्रतिष्ठा राखत आपआपल्या गावातल्या नगरपंचायती ताब्यात ठेवल्या आहेत.

In the Nagar Panchayat elections, BJP’s number one NCP pushed Congress-Shiv Sena back !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात